‘तेज’मुळे अशी असेल महाराष्ट्रात पावसाची स्थिती ! | पुढारी

‘तेज’मुळे अशी असेल महाराष्ट्रात पावसाची स्थिती !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाचे रविवारी महाचक्रीवादळात रूपांतर होऊन वेग ताशी 170 ते 200 कि.मी. झाला. त्यामुळे अरबी समुद्र प्रचंड खवळला असून मच्छीमारांना अतिसावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हे महाचक्रीवादळ 26 रोजी येमेन-ओमानच्या दिशेने जाणार आहे. यामुळे फक्त दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 8.30 वाजता तेज चक्रीवादळाचा वेग वाढून महाचक्रीवादळांत रूपांतर झाले. या वादळामुळे दक्षिण भारतात ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात वादळी वार्‍याचा वेग ताशी 170-180 किमी असून, तो 200 किमीपर्यंत वाढणार आहे. हा वेग मंगळवारनंतर हळूहळू कमी होईल. दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button