Rain Update : राज्यात आजपासून पुन्हा एकदा मुसळधार | पुढारी

Rain Update : राज्यात आजपासून पुन्हा एकदा मुसळधार

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेले अनेक दिवस खंडित झालेला पाऊस राज्यात पुन्हा परत येत आहे. शुक्रवारपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, येत्या काही तासांत तो तीव्र होण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग वाढला असून, उत्तर भारतात पाऊस पुन्हा वाढणार आहे.

सध्या मान्सूनचा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी आला आहे. तसेच उत्तर भारतातून बाष्पयुक्त वारे विदर्भमार्गे राज्यात येत आहेत. त्याचा परिणाम आगामी काही दिवस राज्यात दिसणार आहे. कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे; तर विदर्भात 21 ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 18 व 19 रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा :

पावसाळी अधिवेशनाचे फलित

मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते परंतु देशाच्या पंतप्रधानांना तिथे भेट द्यावीशी वाटत नाही : शरद पवार

Back to top button