छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांकडून एकास अटक | पुढारी

छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांकडून एकास अटक

पुणे : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पुण्यात असताना काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी पुणे पोलीसांना याची तात्काळ माहिती देण्यात आली होती. याची दखल घेत धमकी देणाऱ्या व्यक्तीला मोबाईल नंबरच्या आधारे पुणे पोलिसांनी महाडमधून अटक केली आहे.

प्रशांत पाटील असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत छगन भुजबळ यांच्या सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करुन धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवला

मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून दिल्या गेलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंत्री भुजबळ सध्या पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस मध्ये आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

Back to top button