राज्यातील 3 जिल्हे काठावर पास ; जूनमध्ये पावसाची सरासरी कमीच | पुढारी

राज्यातील 3 जिल्हे काठावर पास ; जूनमध्ये पावसाची सरासरी कमीच

आशिष देशमुख :

पुणे : जूनमधील पावसाच्या सरासरीचा विचार करता, गेल्या पाच वर्षांत यंदा प्रथमच राज्यातील 33 जिल्ह्यांत खूप कमी पाऊस झाला आहे. भंडारा, गोंदिया व पालघर हे तीनच जिल्हे सरासरीत काठावर पास झाले आहेत. राज्यात जूनमध्ये एकूण पावसाची तूट 50 टक्के आहे.

यंदा जून महिना संपताना
राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने गेल्या पाच वर्षांत प्रथमच इतकी कमी सरासरी भरली आहे. मराठवाड्यात पावसाची तूट सर्वाधिक (68 टक्के) आहे. त्या खालोखाल मध्य महाराष्ट्रात 58 टक्के, विदर्भात 48 टक्के, तर कोकणात 36 टक्के तूट आहे.

राज्यात अशी आहे पावसाची तूट (टक्केवारी)
मराठवाडा विभाग ः (68टक्के) छत्रपती संभाजीनगर -55, बीड-64, हिंगोली -96, जालना -84, लातूर -36, नांदेड-80, धाराशिव -84, परभणी -51
मध्य महाराष्ट्र ः (58टक्के) उत्तर महाराष्ट्रासह पुणे -45, नगर -39, कोल्हापूर -62, सांगली -81, सातारा -62, सोलापूर -72, जळगाव-67, धुळे -73, नाशिक 51, नंदुरबार -62
विदर्भ ः (48टक्के) अकोला -81, अमरावती -62, भंडारा (16), बुलडाणा -74, चंद्रपूर -54, गडचिरोली -38, गोंदिया (13), नागपूर -31, वर्धा -61, वाशिम -66, यवतमाळ -63
कोकण विभाग ः (36टक्के) मुंबई -37, पालघर (17), रायगड -31, रत्नागिरी – 56,सिंधुदुर्ग -68, मुंबई उपनगर -1

या जिल्ह्यात पावसाची समाधानकारक स्थिती

राज्यात नेहमी जूनमध्ये अवर्षाणाच्या यादीत असणारे विदर्भातील भंडारा, गोंदिया हे जिल्हे यंदा सरासरीत चक्क अव्वल ठरले आहेत. भंडाराची सरासरी 180 मि.मी. आहे. तेथे 206 मि.मी. पाऊस झाला. गोंदियात 185 मि.मी. सरासरी असताना 209मि.मी. पाऊस झाला. याचे मुख्य कारण यंदा विदर्भातून मान्सून सक्रिय झाला. पालघरमध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तयार झाल्याने तेथे 17 टक्के अधिक पाऊस झाला.

हे ही वाचा :

भाजपचे गोव्यात सलग जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी नाही शरद पवारांनी घेतली पुतण्याची विकेट

Back to top button