अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे | पुढारी

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदी शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे चर्चेत होती. अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. हे संमेलन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून लवकरच कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांचे साहित्य

अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित, मूळ हिंदी लेखक – विश्वनाथ प्रसाद तिवारी), अदृष्टाच्या वाटा (कथासंग्रह), अश्वमेध (कादंबरी, पडघम कादंबरीचा पुढचा भाग), उत्तरायण (महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी), ऐशा चौफेर टापूत (आत्मकथन), ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह), कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षा ग्रंथ), कोंडी (कादंबरी), गोत्र, चंद्रोत्सव (कथासंग्रह), चिरेबंद, जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा), तद्भव (कादंबरी), त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा), दाही दिशा (कथासंग्रह), पडघम (कादंबरी), पांढर (कादंबरी), पांढरे हत्ती, प्रवाह (कादंबरी), मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (संपादित), मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा), महत्तम साधारण विभाजक (कादंबरी), महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, रक्तध्रुव (कादंबरी), वर्तमान (कथासंग्रह). शहामृग (कथासंग्रह), सत्त्वशोधाच्या दिशा (कादंबरी), संदर्भासह (साहित्य आणि समीक्षा), सव्वीस दिवस (कादंबरी)

डॉ. शोभणे यांना मिळालेले पुरस्कार : ‘उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदपदी त्‍यांनी भुषवले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button