अकरावीचा पहिला भाग भरण्याचा आज अंतिम दिवस | पुढारी

अकरावीचा पहिला भाग भरण्याचा आज अंतिम दिवस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दहावीचा निकाल लागल्यानंतर 8 जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी 12 जूनची, तर दुसरा भाग भरण्यासाठी 15 जूनची मुदत होती. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरता आला नाही. त्यामुळे पहिला भाग भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, 14 जूनला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची संधी असून, अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात कॅप आणि कोटा फेरीच्या पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. संचलनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 3 लाख 91 हजार 144 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 3 लाख 35 हजार 334 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर 3 लाख 29 हजार 198 विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी पूर्ण केलेली आहे.

2 लाख 52 हजार 423 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून पहिल्या फेरीत सहभागी झाले आहेत. राज्य मंडळाकडून दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला असून, गुणपत्रिका बुधवारी (दि.14) देण्यात येणार आहेत. गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे. त्यानंतर अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

नियमित प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक
पहिल्या फेरीसाठी अकरावी प्रवेशाचा भाग एक भरणे : 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत
मार्गदर्शन केंद्रांनी अर्जाचा भाग एक प्रमाणित करणे : 14 जून रात्री 10 वाजेपर्यंत
अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : 15 जून
गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे : 15 ते 17 जून
अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरणे : 17 जूनपर्यंत
अंतिम गुणवत्ता यादीचा डेटा प्रोसेसिंग : 18 ते 20 जून
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : 21 जून
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे : 21 ते 24 जून
कोटाअंतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक
विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे : 14 जून
कोटाअंतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे : 15 जून
कोटाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे : 15 ते 17 जून
कोटाअंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे : 17 जून
विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे : 18 ते 20 जून
कोटाअंतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे : 21 जून
कोटाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे : 21 ते 24 जून
कोटाअंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे : 24 जून

हे ही वाचा : 

Nigeria boat capsized : नायजेरियात बोट उलटली; १०० जणांच्या मृत्यूची भीती

मान्सून 25 जूननंतरच जोर धरणार ; बिपरजॉय चक्रीवादळाने खेचून घेतली आर्द्रता

Back to top button