बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

१.mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news