कर्नाटक निकालाने भाजपची घसरणीला झाली सुरुवात : आ थोरात

कर्नाटक निकालाने भाजपची घसरणीला झाली सुरुवात : आ थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा सभा निवडणुकीवरती कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असून या निकालामुळे भाजपची खऱ्या अर्थाने घसरणीला सुरुवात झाली असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कानडी जनतेने भाजपला नाकारले असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

याबाबत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, की सध्या 'भाजपकडून देशात व विविध राज्यांत जे फोडाफोडीचे आणि दबावाचे राजकारण सुरू केले ते भारतीय जनतेला अजिबात ही मान्य नाही. भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला भारतीय जनता आता पुरती वैतागली' असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपकडून स्वायत्त संस्थाचा राज कारणासाठी होणारा वापर हा भविष्यातील लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपचा दिसत आहे.  हे सर्व थांबवून देशातील सर्वांना बरोबर घेऊन लोकशाही वाचवायची असेल तर इथून पुढील काळात भाजपचा पराभव करणे गरजेचे आहे. देशातील धोक्यात आलेली लोकशाही वाचविण्याचा काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी व सोनिया गांधी करत आहे त्याला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे कर्नाटकच्या निवडणुकी निकालावरून दिसून आले आहे.

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या 'भारत जोडो' यात्रेचा प्रतिसाद कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत मिळाला आहे का असे विचारले असता आ. थोरात म्हणाले की, 'काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेला हा फार मोठा प्रयत्न आहे. त्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीवर झाला असल्याचे आज जाहीर झालेल्या निकाला वरून दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news