राजीनाम्याचा विषय संपला, आता कामे : शरद पवार | पुढारी

राजीनाम्याचा विषय संपला, आता कामे : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला होता. शुक्रवारी (दि. ५) त्यांनी तो मागे घेतल्यानंतर शनिवारी (दि. ६) विविध कामांसाठी ते बारामतीत दाखल झाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले असता राजीनाम्याचा विषय संपला, तो आता सोडून द्या, आता कामे सुरु असे म्हणत पवार यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. खुद्द बारामतीत जुन्या फळीतील अनेकांसह राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, पक्षाला त्यांची गरज असल्याचे सांगितले होते. मुंबईत २ मे पासून घडणाऱ्या या घटनांकडे बारामतीकरांचे लक्ष होते. अखेर शुक्रवारी पवार यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी भवनासह शारदा प्रांगणातील शहर कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता.

राजीनामा नाट्यानंतर शनिवारी (दि. ६) बारामतीत दाखल झाले. काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. गोविंदबाग या निवासस्थानातून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना गाठले. राजीनाम्याच्या विषयावर विचारणा केली असता तो विषय संपला, तो आता सोडून द्या, आता कामे करायची असे म्हणत पवार यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

संबंधित बातम्या
Back to top button