पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटी 12 लाख 24 हजार 58 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेली 9 लाख 50 हजार 363 बालके आजारी आढळली. त्यापैकी 6 लाख 78 हजार 64 बालकांवर उपचार करण्यात आले. 3 लाख 4 हजार 183 बालकांना पुढील उपचारांसाठी पाठविले आहे.
शून्य ते 18 या वयोगटातील मुलांची तपासणी अभियानात करण्यात आली आहे. ज्या मुलांना गंभीर आजार आढळले आहेत किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये 4,720 बालकांना शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे निदान झाले आहे. यातील 1,708 बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्मजात दोष, जीवनसत्त्वांची कमतरता, कानाचे आजार यांसह अन्य आजारांची तपासणी अभियान राबविल्याची माहिती दिली.