कार्यकर्त्याचं असंही प्रेम ! राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांना लिहिलं रक्ताने पत्र

कार्यकर्त्याचं असंही प्रेम ! राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांना लिहिलं रक्ताने पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. एकीकडे राजकीय विश्लेषक शरद पवारांच्या या भूमिकेबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावत आहेत तर दुसरीकडे कार्यकर्ते मात्र साहेबांच्या या निर्णयाने अस्वस्थ दिसत आहेत.

पुण्यातील एका कार्यकर्त्याने मात्र निष्ठेचं नवीन परिमाण घालून दिलं आहे. साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे  यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिलं आहे. 'आपण घेतलेल्या निर्णयाची बातमी वाचून व्यथित होऊन मी हे पत्र लिहीत आहे… आम्हाला पोरकं करू नका. साहेब मी आपला निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला तुमच्या नेतृत्वात काम करायच आहे. आपण आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.' असा मजकूर संदीप यांनी या पत्रात लिहिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी घेतलेली भूमिका पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्का देणारी ठरली. अनेकानी वाहिन्यांवर हा कार्यक्रम पाहिला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्याना धक्का बसला. सोशल मिडियावर मात्र कार्यकर्ते व्यक्त होताना दिसत आहेत. साहेब तुम्ही राजीनामा मागे घ्या अशा विनवणीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. लोकभावनेचा विचार करुन साहेब आपला राजीनामा मागे घेतील अशी आशा पदाधिकारी- कार्यकर्त्याना आहे

logo
Pudhari News
pudhari.news