जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 4 जूनला

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 4 जूनला

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देशातील आयआयटी, एनआयटी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा येत्या 4 जूनला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
जेईई मेन्समधील पात्र ठरलेल्यांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देश-विदेशातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राष्ट्रीयस्तरावर दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली.

जानेवारीमध्ये पहिले सत्र झालेले असताना नुकतेच एप्रिलमध्ये जेईई मेन्सचे दुसरे सत्र झाले होते. या दोन्ही परीक्षांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन्हींपैकी सर्वोत्तम पर्सेंटाइल ग्राह्य धरून राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाईल. या क्रमवारीच्या आधारावर जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्रता निश्चित होणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक
अर्जास सुरुवात : 30 एप्रिल
अंतिम मुदत : 7 मे
शुल्क भरण्याची मुदत : 8 मे
परीक्षेची तारीख : 4 जून
परीक्षेचा निकाल : 24 जून

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news