शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
Latest
मोठी बातमी ! राज्यात यंदा 12 जूनपासून शैक्षणिक वर्षाचा श्री गणेशा
गणेश खळदकर
पुणे : राज्यात यंदा विद्यार्थ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर 12 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पाटील यांनी विभागीय उपसंचालक, शिक्षण अधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना दिलेल्या सूचनांनुसार मंगळवार दि.02 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करुन संबंधित सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा.
पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाांचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील. पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल दि. 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल.
तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी घेण्यासाठी समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरुन द्यावेत.
माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
अशा प्रकारे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचीत करावे असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होणार या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी, पालक,शिक्षकांना मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

