पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर
Published on
Updated on

पुणे : सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह आज थेट मैदानात उतरणार आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपने अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर्सदेखील लावण्यात आले आहेत. त्यांचा हा दौरा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर महत्वाचा ठरणार का याकडे पुणेकरांचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज पुण्यात दुपारी अमित शाह यांच्या हस्ते 'मोदी अ‍ॅट 20' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन होणार आहे. तसेच ते पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तर उद्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.

असा असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुणे दौरा?

  • आज दुपारी 2:35 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळावर आगमन
  • 2 : 50 वाजता सिंहगड कॉलेजच्या हेलिपॅडजवळ त्यांचा ताफा पोहोचेल
  • 3 वाजता सहकार परिषद, दैनिक सकाळ, हॉटेल टिपटॉप, वाकड येथे ते हजेरी
  • पाच वाजता काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये साधणार संवाद
  • आठ वाजता मोदी @20 पुस्तक प्रकाशन शहांच्या हस्ते होणार
  • रात्री 9 वाजता ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेणार
  • रात्री उशिरा खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार
  • 19 तारखेला बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या एका टप्प्याचं लोकार्पण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news