धक्कादायक! मुलबाळ, आर्थिक सुबत्तेसाठी दिली स्मशानातील राख पिण्यासाठी; हाडांची पावडरही लावली खायला | पुढारी

धक्कादायक! मुलबाळ, आर्थिक सुबत्तेसाठी दिली स्मशानातील राख पिण्यासाठी; हाडांची पावडरही लावली खायला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुलबाळ होत नसल्याने व आर्थिक सुबत्तेसाठी विवाहितेला स्मशानभूमीतील राख पाण्यातून पिण्यासाठी देऊन नंतर पिस्तूलाचा धाक दाखवून हाडांची पावडर खाण्यासाठी देऊन कौटुंबिक छळ करत अघोरी कृत्य करणाऱ्या सासरच्यांवर सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे कृष्णा विष्णू पोकळे ( सर्व रा. राधाकृष्ण व्हीला, पोकळे परडाईज, धायरी), दीपक जाधव आणि बबीता उर्फ स्नेहा जाधव ( रा. निगडी प्राधिकरण) यांच्यावर 28 वर्षीय विवाहितेनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऍड. हेंमत झंझाड फिर्यादीच्या वतीने काम पाहत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार महिला ही कम्प्युटर इंजिनिअर असून तक्रार महिलांसाठी मुलगा पण काम सुरू असताना नातेवाईकांकडून त्यांना जयेश मोठा बद्दल त्यानंतर लग्नाची बोलणी झाली. टिळ्याचा कार्यक्रम झाल्यानतर जयेशचे वडील कृष्णा पोकळे यांनी साखरपुडा हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, ऐशी तोळे सोने, साखरपुडयासाठी आमचेकडुन येणाऱ्या प्रत्येक महिलेला चांदीचे जोडवे घ्यायचे अशी मागणी केली. तक्रारदाराच्या विडिलांनी विनाकारण शुभकार्यामध्ये विघ्न नको म्हणून त्यांनी मागणीला होकार दिला. त्यानुसार फाईव्हस्टार हॉटेलमध्ये साखरपुडा झाला.

साखरपुडयामध्ये त्यांच्याकडुन आलेल्या जवळपास पंचेचाळीस महिलांना जोडवी देण्यात आली. लग्नाचा कार्यक्रम दि. 27 एप्रिल 2019 थाटामाटात करून देण्याचे ठरले. त्यापुर्वी मुलाच्या वडीलांनी तक्रारदाराच्या वडिलांना फोन करून मुलासाठी चारचाकी गाडी घेवून देण्याबाबत वारंवार तगादा लावल्याने 5 लाख 60 हजार रुपयांची गाडी घेऊन दिली.

लग्नानंतर काही दिवसात छळ सुरू 

लग्न झाल्यानंतर सासरी नांदायला गेलेल्या विवाहितेचा काही दिवसात छळ सुरू झाला. सासाऱ्यांच्या मागणीनुसार सणाला जयेशला
सोन्याचे दागिने आणि मागणीनुसार गाडी घेण्यासाठी दहा लाख रुपये दिले. अमावस्येला सर्वजण एकत्र जमुन काळे कपडे घालून तळघरातील रहस्यमय खोलीमध्ये काहीतर करत असत. 22 मे 2020 या अमावस्येच्या दिवशी अघोरी पुजा माडली. कोणत्यातरी महिलेला व्हॉट्सअपचे माध्यमातुन व्हिडीओ फोन लावुन समोरील महिला काही सांगत होती त्याप्रमाणे सदरची पूजा केली जात होती.

स्मशानातील राख दिली पिण्यासाठी

व्याससायिक भरभराटीसाठी व फिर्यादीला मूलबाळ होत नाही यामुळे प्रत्येक अमावस्येला अघोरी कृत्यांचा प्रकार हा जास्त होत गेला. एका अमावस्थेच्या दिवशी रात्री 10 वाजण्याचे सुमारास दिर, जाऊ, पती व सासुसासरे हे सगळे आमच्या घराजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन तेथे जळालेल्या मृत प्रेताची काही हाडे गोळा केली. राख मडक्यात घेतली. ते सगळ घरी आणुन त्याची पूजा केली. त्यानंतर ते हळदी- कुंकू व स्मशानामधुन आणलेली राख पाण्यामध्ये मिक्स करून तक्रारदाराला पिण्यासाठी दिले.

हाडांची पावडर आणि कोकणात धबधब्याच्या खाली अंघोळ करण्यास लावले 

जावेच्या आईवडिलांच्या निगडी येथील घरी 11 फेब्रुवारी 2021 रोजी अमावस्येच्या दिवशी पूजा असल्याचे सांगुन फिर्यादीला निगडी येथे घेऊन गेले. तिथे एक विचीत्र पद्धतीची पूजा माडलेली होती. तेथे मांत्रिक महिलेने मला पुजेच्या ठिकाणी बसण्यास सांगितले. पुजेमध्ये मृत मानसाचे केस, हाड, घुबडाचे पाय व कोंबड्याचे मुडके हे सर्व जावेच्या आईवडिलांनी अगोदरच आणुन ठेवले होते. तसेच सदर मानिक महिला अर्धा तास अघोरी पूजा करत होती. त्यानंतर हाडाची पावडर करून मला एकटीलाच त्या मांत्रिक महिलेने खायला सांगितली.

त्यास मी नकार दिला असता जाऊ व तिच्या आईवडिलांनी माझ्यावर बळजबरी करून व वडील दिपक जाधव यांनी त्यांचेकडील रिव्हॉल्व्हर काढुन ती माझ्या डोक्याला लावुन मला सदरची पावडर खाण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या. त्यांचा अंगावर रिअॅक्शन झालेली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये तक्रारदाराच्या सासरकडील लोकांनी जावेबरोबर तिच्या आईवडिलांच्या गावी कोकणात एका पुजेसाठी पाठवले होते. तेथे मध्यरात्री तिला एका धबधब्याखाली आंघोळ करायला लावली. त्यावेळी जावेने मांत्रिक महिलेशी व्हॉट्सअॅप कॉलवर मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जावेचे आईवडील यांनी तिला अघोरी कृत्य करायला लावले.

फिर्यादीने घेतली महिला आयोगाकडे धाव 

सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 मध्ये पती व दिर यांनी फिर्यादीच्या वडिलांकडे क्रेटा गाडी घेण्यासाठी पैशाची मागणी केली. छळ होऊ नये म्हणुन त्यांना क्रेटा गाडी घेण्यासाठी आठ लाख रुपये दिले. फिर्यादीच्या माहेरच्या लोकांनी दिलेले स्त्रीधन/ दागिणे हे त्यांच्या लॉकरमध्ये आहे. गावामध्ये चोर सुटले आहे, असे कारण देऊन त्यांनी तिच्याकडुन स्त्रीधन घेतले हे दागिणे लॉकरमधुन काढुन दिलेले नाहीत. दि. 26 में 2022 रोजी हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादीने महिला आयोगाकडे धाव घेतल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांकडे पाठवले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव करत आहे.

Back to top button