जामखेडमध्ये 15 हजार चौरस फुटांत राजमाता जिजाऊंचे जगातील सर्वांत मोठे रेखाचित्र | पुढारी

जामखेडमध्ये 15 हजार चौरस फुटांत राजमाता जिजाऊंचे जगातील सर्वांत मोठे रेखाचित्र

जामखेड (जि. अहमदनगर) : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेडमधील नागेश विद्यालयाच्या मैदानावर 15 हजार स्क्वेअर फूटमध्ये जगातील सर्वात मोठे राजमाता जिजाऊ यांचे रेखाचित्र तयार केले आहे. चित्रकार उद्देश पघळ यांनी हे चित्र साकारले असून, नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले व ‘एनसीसी’च्याविद्यार्थ्यांनी चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केले.

अवघ्या चार दिवसांत रेखाचित्र पूर्ण झाले आहे. चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणार्‍या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आला असून, पांढरा व काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर केलेला आहे. 12 जानेवारी रोजी सकाळी स्थानिक पदाधिकारी आणि महिलांच्या हस्ते या रेखाचित्राचे उद्घाटन होणार आहे.

  • जागतिक पातळीवर लिम्का बुक, गिनीज बुक आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली नोंद
  • संपूर्ण चित्र अवघ्या चार दिवसांत बनविले
  • 21 ब्रास मोठी खडी, 30 गोण्या पांढरा चुना व 22 गोण्या काळा चुना वापरण्यात आला आहे
  • जगातील सर्वात मोठे राजमाता जिजाऊ यांचे रेखाचित्र

Back to top button