मांढरदेवी यात्रेला उद्यापासून सुरुवात; यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू, अन्यथा होणार कारवाई | पुढारी

मांढरदेवी यात्रेला उद्यापासून सुरुवात; यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू, अन्यथा होणार कारवाई

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : सातारा जिल्ह्यातील मांढरगाव येथील काळूबाई देवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या यात्रेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. देवीची यात्रा ही ६ जानेवारी ते ९ जानेवारी सलग तीन दिवस असून, या यात्रेला शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. या देवीच्या यात्रेला ७ लाखाहून अधिक भाविक गडावर देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात. २००५ मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटनेनंतर असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासनाने गडावरील यात्रेला निर्बंध लावले आहेत.

प्रशासनाकडून लावलेले निर्बंध

देवीच्या यात्रेच्या काळात पशुहत्या करण्यास मनाई असेल, तसेच कोंबड्या, बकऱ्या, बोकड इत्यादी प्राण्यांच्या वाहतुकीस बंदी घातली आहे. मांढरदेव परिसरात वाद्ये आणण्यास, वाजवण्यास, झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहुल्या अडकवणे, लिंबू आणि बिब्बे ठोकणे, भानामती करणे, करणी करणे यास पूर्णपणे बंदी असेल. मंदिर परिसरात नारळ फोडणे आणि तेल वाहण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच मद्य बाळगणे आणि पिण्यास यास सक्तीची मनाई असेल. मांढरदेवी गडावरील अंधश्रध्दा संपुष्टात आणण्यासाठी ही योग्य पावलं प्रशासकीय यंत्रणेने उचलली आहेत.

Back to top button