पुणे : थंड वार्‍यांमध्ये अडथळे आल्यामुळे थंडीची प्रतीक्षाच | पुढारी

पुणे : थंड वार्‍यांमध्ये अडथळे आल्यामुळे थंडीची प्रतीक्षाच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रावातामुळे थंडीचा कहर आणि दाट धुके पडले आहे. मात्र, या भागाकडून राज्याकडे येणा-या थंड वा-यांमध्ये अडथळे आल्यामुळे राज्यात जोरदार थंडीची प्रतीक्षाच असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे थंडी वाढण्यात अडथळे येत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. पहाटे आणि सकाळी थंडी जाणवत आहे. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत उकाडा जाणवत आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी थंडी असे वातावरण आहे.

Back to top button