Interfaith marriage : आंतरधर्मीय विवाहांसाठी परिवार समन्वय समिती | पुढारी

Interfaith marriage : आंतरधर्मीय विवाहांसाठी परिवार समन्वय समिती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणाच्या व्यक्तींची इत्थंभूत माहिती जमा करणे, नवविवाहित मुली- महिलांचा आई-वडिलांशी संपर्क- समन्वय घडवून आणणे, आईवडील किंवा मुली समन्वयासाठी तयार नसतील तर समुपदेशनातून वाद मिटविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम परिवार समन्वय समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली परिवार समन्वय समितीत तेरा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आई-वडील इच्छुक नसल्यास समुपदेशनातून त्यांच्यातील वादाचे निराकरण करण्याचे काम समन्वय समिती करणार आहे. या समितीत महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव, महिला व बालविकास आयुक्त, विभागाचे सहसचिव, नांदेडचे अॅड. योगेश देशपांडे, औरंगाबादचे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता जोशी, मुंबईतून अँड. प्रकाश साळशिंगीकर, नागपूरमधून यद् गौडिया, अकोल्यातून मीराताई कडवे, पुण्यातून शुभदा कामत, मुंबईतून योगीता साळवी, उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांचा समावेश आहे.

हेही वाचा

Back to top button