मुंबई - महिलेला 'आयटम' म्हणणे विनयभंगच : युवकाला दीड वर्षांची शिक्षा | पुढारी

मुंबई - महिलेला 'आयटम' म्हणणे विनयभंगच : युवकाला दीड वर्षांची शिक्षा

मुंबई - महिलेला 'आयटम' म्हणणे विनयभंगच : युवकाला दीड वर्षांची शिक्षा

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : एका अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ म्हणणे मुंबईतील २५ वर्षांच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेला आयमट म्हणणे हा विनयभंगच आहे, असा निर्वाळा देत मुंबई न्यायालयाने या युवकाला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांनी ही शिक्षा सुनावली. ‘आयटम’ म्हणणे लैंगिक दृष्ट्या महिलांचे वस्तुकरण करणारे आहे, त्यामुळे विनयभंगाच्या कलम ३५४ नुसार तो गुन्हा ठरतो, असे त्यांनी म्हटले आहे. (Calling woman item amounts to outraging her modesty)

हा युवक व्यावसायिक आहे. त्याला भारतीय दंड संहिता कलम ३५४ आणि Protection of Children under Sexual Offences (POCSO)Act तरतुदींनुसार दीड वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या वर्तणुकींना पायबंद घालणे आणि गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण मुलांचा अपमान करणे आणि त्य़ांचे वस्तुकरण करणे यासाठी मुले हा शब्द मुलांसाठी वापरतात. मुलींचा विनयभंग करण्याचा हेतू यातून स्पष्ट होतो. अशा गुन्ह्यांना चाप लावणे आवश्यक आहे. रोड रोमिओंच्या वर्तणुकींपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हे आवश्यक आहे,” असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील दोषी तरुण आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. २०१५ला ही मुलगी शाळेतून परत येत असताना या तरुणाने या मुलीची छेड काढली होती. हा प्रकार सुरू असताना मुलीने १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना कल्पना दिली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचताच या तरुणाने पळ काढला होता. या मुलीने आणि तिच्या वडिलांनी नंतर पोलिसांत तक्रार दिली.

“मुलीच्या आणि या तरुणाची मैत्री होती. पण मुलीच्या पालकांचा या मैत्रीला विरोध होता, त्यातून ही तक्रार दिली,” असा बचाव दोषी युवकाच्या वतीने सादर करण्यात आला. पण न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.

हेही वाचा

Back to top button