

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे चिन्ह आणि नाव वापरण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. याचपार्श्वभूमीवर अरविंद सावंत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोग देखील आता वेठबीगार झाली आहे. कोणाच्या आदेशाने हा निर्णय दिलेला आहे. खूपच चुकीचा असा हा निर्णय आहे. असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध केला.
ते म्हणाले की, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. छाननी न करता दिलेला निर्णय हा देशातील संविधानाच्या विरोधात आहे. सातत्याने अशाप्रकारचे चुकीचे निर्णय देत आहेत. हा निर्णय आला असला तरीही शिवसेना अधिक मजबुत होणार असे ते म्हणाले. याबाबत अधिक बोलत असताना ते म्हणाले की, शिवसेनेकडे सुरूवातीला कोणती निशाणी होती? तरीही शिवसेना मोठी झाली. कारण आमची शिवसेना खरी आहे. हा फक्त तात्पुरता निर्णय आहे. आम्ही याबाबत कोर्टात जाणार आहोत. बापाचं नाव हे बापाचंच राहणार. निवडणूक आयोग हा कोणाचा बाप नाही. हे चिन्ह गोठवलं आहे त्याला कोणाचे आव्हान आहे का? जेवढी संकटं येतील ती आम्ही अंगावर घेतली आहेत. लढलो आहोत.
अरविंद सावंत यांनी आज सकाळी त्यांच्या ट्विटर अकाऊंवरून एक ट्विट देखील केले होते. त्यांनी यामध्ये लिहिले होते की, घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय दाखवता येऊ शकतो? वंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेले शेड्युल १० हे जाणीवपूर्वक झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पक्षांतर बंदीचा कायदा पायदळी तुडवला जात आहे.
हेही वाचा