पिंपरी: जमिनावर सुटलेल्या अध्यक्षांनी घेतली 'स्थायी' सभा | पुढारी

पिंपरी: जमिनावर सुटलेल्या अध्यक्षांनी घेतली 'स्थायी' सभा

पिंपरी; मिलिंद कांबळे : लाचखोरी प्रकरणात जेलवारी करून जामिनावर असलेले भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी बुधवारी (दि.1) स्थायी समितीची ऑनलाइन माध्यमातून सभा घेतली. त्यांनी 10 मिनिटांत कामकाज आटोपत कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले.

भ्रष्टाचाराचा मुख्य मुद्दा घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. लाचखोरी घटनेवरून महापालिकेची राज्यभरात बदनामी झाली आहे. विरोधक आक्रमक झाले असून, ते अध्यक्षांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करीत आहेत. त्यासाठी गेल्या 3 आठवड्यापासून पालिका भवनावर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन वंचित आघाडीसह विविध संघटनांनी आंदोलने केली आहेत. असे असतानाही अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी बुधवारी (दि.1) स्थायी समितीची ऑनलाइन माध्यमातून सभा घेतली. त्यांनी 10 मिनिटांत कामकाज आटोपत कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले.

विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. ते अद्याप दोषी आढळलेले नसून, विकासकामे आडू नये म्हणून सभा घेतल्याचे भापजने स्पष्ट केले. तर, अध्यक्षांवर कारवाई न करता सभा कामकाज करीत असल्याबद्दल राष्ट्रवादीने संताप व्यक्त केला आहे.

Back to top button