देवेंद्र फडणवीस यांना कोण मुख्यमंत्री होणार माहित नव्हतं? शिंदेंना सर्व माहिती होतं? वाचा पडद्यामागची गोष्ट | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांना कोण मुख्यमंत्री होणार माहित नव्हतं? शिंदेंना सर्व माहिती होतं? वाचा पडद्यामागची गोष्ट

पुढारी ऑनलाईन: “भारतीय जनता पक्षाने असा निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे गटाला आम्ही समर्थन देणार असून एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील,” अशी घोषणा राजभवनामधील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणि आपण मात्र या मंत्रीमंडळामध्ये सहभागी होणार नाही. तसेच सरकारचं काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही यावर लक्ष ठेवून असणार आहे असं सांगितलं. एकनाथ शिंदे हे एकटेच सायंकाळी साडेसात वाजता शपथ घेतील अशी घोषणा फडणवीस करतात.

नंतर संध्यकाळी शपथविधीच्या बरोबर अर्धा तास आधीपर्यंत हीच परिस्थिती असताना अचानक दिल्लीमधील भाजप नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासाठी देशाच गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंती केल्याचं ट्विटरवरुन सांगण्यात आलं. या सर्व गोष्टी घडत असताना यामध्ये अनेक ट्विस्ट आले. या सर्व ट्विस्टची माहिती मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना नव्हती असं अजिबात नाही.

जेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्र भाजपमधील लोकांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद साजरा केला. भाजप नेत्यांनासह सर्वांना वाटत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण हे सर्व चित्र अवघ्या २४ तासात पालटलं. हे असं होईल याची पुसटशी कल्पनासुद्धा महाराष्ट्र भाजप नेत्यांना कशी नव्हती याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एकीकडे ही चर्चा सुरु असली तरी याची सर्व कल्पना एकनाथ शिंदे यांना होती. त्यांना केंद्रीय भाजप नेत्यांनी कायम संपर्कात ठेवलं होतं असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा शब्द घेऊनच मूंबईत आल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सर्व नेत्यांसह जनतेला देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं वाटत होतं पण झालं उलटं.

Back to top button