आषाढी वारी दिंडी सोहळा : आषाढी वारीसाठी ‘पंढरीची वारी’ ॲपची निर्मिती

आषाढी वारी दिंडी सोहळा : आषाढी वारीसाठी ‘पंढरीची वारी’ ॲपची निर्मिती
Published on
Updated on

पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीनिमित्त (आषाढी वारी दिंडी सोहळा) १५ लाखांहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला आला आहे. वारकऱ्यांना गर्दीच्या काळात मदत व्हावी, म्हणून प्रथमच यावर्षी आषाढी वारी मध्ये "पंढरीची वारी" हे मोबाईल अँप सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंदिर समितीच्या माध्यमातून तयार केले असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या सुदर्शन मकर, आशुतोष देशपांडे, गौरव मुळे, सैफ शेख, अभिजित नलवडे आणि मोईन मुजावर या सहा विद्यार्थ्यांनी मंदिर समितीच्या मदतीने "पंढरीची वारी" हे अँप दीड महिन्यात (आषाढी वारी दिंडी सोहळा) तयार केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून आषाढी वारीतून पंढरपूरात आलेल्या भाविकांना येथील सुविधांची माहिती उपलब्ध होणार आहे. हे अँप एका मिनिटात २५० हुन अधिक व्यकीच्या रिक्वेस्ट स्विकारून, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती उपलब्ध करून देऊ शकते. याशिवाय पालखी मार्गावर वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्‍याची मोठी मदत होणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी "पंढरीची वारी" (आषाढी वारी दिंडी सोहळा)  हे अँप तयार केले आहे. ॲड्रॉइड मोबाईल मधील प्ले स्टोअरमधून "Pandharichi wari" हे  ॲप डाऊनलोड करतात येईल. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास एक तास बदल करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.

अशी मिळणार ॲपवर माहिती

ज्या महामार्गावरून दिंडी सोहळा येणार आहे, वारी प्रस्‍थानापासून पंढरपूरात (आषाढी वारी दिंडी सोहळा) पोहोचेपर्यंत हे अँप वारकऱ्यांना माहिती देणार आहेत. यामध्ये वारीचे मुक्काम ठिकाण, पोलीस स्टेशन, मंदिर, पाण्याचा टँकर, हॉस्पिटल, वाहनतळ, शाळा, शौचालय, जवळपासची शासकीय कार्यालय आदी गोष्टी अँपमध्ये दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news