शिर्डी : साईंच्या प्रसादात चक्क आमरसाची मेजवानी | पुढारी

शिर्डी : साईंच्या प्रसादात चक्क आमरसाची मेजवानी

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : साईबाबांच्या विलक्षण आणि तेजस्वी दर्शनाने साई भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात, मात्र महाप्रसाद घेतल्या शिवाय साई भक्तांचे समाधान होत नाही. अशा महाप्रसादाची सोय असणाऱ्या साई प्रसादालयात भाविकांना आज चक्क आमरसाची मेजवानी मिळाली. ही मेजवानी एका देणगीदाराच्या देणगीतून मिळाली आहे.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

पुण्याच्या भक्ताने दिले ५ हजार किलो आंबे

साईबाबांच्या चरणी येणाऱ्या दानाची कहाणीच न्यारी आहे. देश विदेशातून भाविक सोने, नाणे, वस्त्र, वाहने, यंत्र, सेवा अशा नानाविध प्रकारे दान दिले जाते. अन्नदान देणारेही देणगीदार असतात. पुण्यातील असेच एक साईभक्त दीपक गर्ग यांनी साई बाबांच्या चरणी ५ हजार किलो केसर जातीचा आंबा दान केला आहे. यासाठी या देणगीदाराने दोन ट्रक भरून आंबे आणले होते.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांसाठी साई प्रसादालय चालविले जाते. देशविदेशातून येणाऱ्या साई भक्तांना या प्रसादालयात भोजन दिले जाते. अनेक वेळा भक्तांच्या देणगीतून वेगवेगळ्या पक्वान्नांची मेजवानी देण्यात येत. गुरुवारी आमरसाच्या मेजवानीने साई भक्त तृप्त झाले.

Back to top button