ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन | पुढारी

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

पुणे , पुढारी वत्तसेवा: रंगरेषांच्या दुनियेतील मुसाफिर आणि ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (वय 87) यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेता येणार आहे. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रातही त्यांनी काम केले.

रवी परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या विविध नियतकालिकांमध्ये संशोधनपर लेखन केले. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे शिखरे रंगरेषांची आणि नीलधवल ध्वजाखाली हे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त होता. त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Back to top button