नाशिक : मुख्यमंत्री, गृहमंत्री दौऱ्यावर असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्री, गृहमंत्री दौऱ्यावर असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील आले आहेत. पण, राज्याचे दोन मोठे मंत्री दौऱ्यावर असतानाही युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

त्यांनी पतीसमवेत नाशिक पोलीस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. राजलक्ष्मी पिल्ले यांनी श्रमिक सेनेचे अजय बागुल यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप केला होता. याबाबत पोलिसांकडून कुठलीही दखल घेतली नाही.

याचा निषेध म्हणून पिल्ले दाम्पत्याने आयुक्तालयापुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंबड पोलीस ठाणे आणि इंदिरानगर पोलिस ठाणे या ठिकाणी तक्रार अर्ज करून देखील न्याय मिळाला नाही. म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर राजलक्ष्मी पिल्ले व त्यांच्या पतीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वेळीच पोलिसांनी या दांपत्याला ताब्यात घेतले.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : नांगरे पाटील

Back to top button