लाल महालात ‘चंद्रा’ लावणी सादर करणाऱ्या वैष्णवी पाटीलने मागितली जाहीर माफी | पुढारी

लाल महालात 'चंद्रा' लावणी सादर करणाऱ्या वैष्णवी पाटीलने मागितली जाहीर माफी

पुणे, पुढारी ऑनलाईन: लाल महाल येथे ‘चंद्रा’ ही लावणी सादर करणारी नृत्य कलाकार वैष्णवी पाटील हिने झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली आहे. तिने व्हिडीओच्या माध्यमातून आपला माफीनामा इंस्टाग्राम वर टाकला आहे. तिच्याविरुद्ध पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि संभाजी ब्रिगेड यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या व्हिडिओमध्ये तिची बाजू तिने मांडली आहे.

तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, आमच्या अर्धवट ज्ञानामुळे आणि बालबुद्धीमुळे ही चूक झाली. या चुकीबद्दल महाराष्ट्रातील सर्व लोकांची आम्ही माफी मागतो. यापुढे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे असे कृत्य घडणार याची हमी देखील देतो. तसेच हा व्हिडिओ बनवण्यामागे कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षाचा हात नाही.

दरम्यान शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसह चौघां विरूद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. बीभत्स लावणी सादर करणाऱ्या सर्वांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.

Back to top button