सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे पुणे जिल्ह्यात | पुढारी

सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे पुणे जिल्ह्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा 
राज्याचे पर्यटन धोरण लागू झाल्यापासून राज्यातील  354 शेतकरी, तसेच  शेतकर्‍यांच्या संस्थांनी कृषी पर्यटन केंद्रे सुरू केली आहेत. त्यातील सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे पुणे जिल्ह्यात 143 आहेत. ग्रामीण भागात कृषी पर्यटन वाढावे, 2025 पर्यंत ग्रामीण भागात पर्यटन क्षेत्राद्वारे दहा लाख रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरण 2020 जाहीर केले. या धोरणात खेडेगाव, शेतीक्षेत्र, शेतकरी हे तीन घटक केंद्रस्थानी ठेवून योजना आखण्यात आली.
यामध्ये शेतकरी किंवा शेतकरी गट किंवा कृषी विज्ञान केंद्र यांना या योजनेत सहभागी होता येते. ग्रामीण भागातील शेती, माती, संस्कृती, पारंपरिक सण, उत्सव, खेळ, बैलपोळा, बैलगाडी, लोककला, शेतीतील उत्पादने, फळे, पिके, पशुधन यांसह खाण्या-पिण्याची, निवासाची सोय करून पर्यटकांना ग्रामीण संस्कृती, गावगाडा याची भुरळ पाडणे. यातून पर्यटन व रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी स्वत:चे कमीत कमी एक एकर क्षेत्र असावे.
24 तास पाण्याची सोय असावी. पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाच्या कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज करावा. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.  या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना, कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे बँकेचे कर्ज मिळण्यास मदत होते. वीज व वस्तू सेवाकरात सवलत जलसंधारण विभागाकडून शेततळे योजना देताना हे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाते.
  • विभाग           अर्ज         प्रमाणपत्र वाटप
  1. पुणे                 269               165
  2. अमरावती         28                  15
  3. नाशिक            56                  20
  4. नागपूर             65                  41
  5. औरंगाबाद        31                  28
  6. कोकण           146                   –

हेही वाचा:

Back to top button