पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेवाच्या उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून साजरी हाेते. त्या रात्री शंकराची पूजा केली जाते. देशभरात महादेवाची मंदिरे आपणास पाहावयास मिळतात. भारतात एकुण १२ ज्योतिर्लिंग (Jyotirlinga) असून, त्यापैकी पाच महाराष्ट्रात आहेत. पाहूया, महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग कोणती आहेत .
१. भीमाशंकर
महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळापैकी एक म्हणजे भीमाशंकर होय. भारतातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये भीमाशंकरचा समावेश होतो. मंदिर भीमा नदीच्या उगमस्थानी असून, हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ते पुण्यापासुन सुमारे ११0, नाशिकपासून २0७ तर मुंबईपासून ११७ किलोमीटर अंतरावर आहे. भीमाशंकराच्या आसपास आपल्याला घनदाट जंगल पाहावयास मिळेल. मंदिरातील शिवलिंग मोठे असल्याने ते मोटेश्वर महादेव मंदिर म्हणुनही ओळखले जाते. हे मंदिराचा समावेश हेमाडपंथी प्रकारात हाेतो. जगभरातील भाविक भीमाशंकर पाहायला येतात. भीमाशंकरच्या आसपास तुम्ही कोकण कडा, सीतारामबाबा आश्रम, नागफणी ही प्रेक्षणीय ठिकाणे पाहू शकता.
२. त्र्यंबकेश्वर
ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहे. हे मंदिर काळ्या शिलाखंडात बांधले गेले आहे. ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर असून, उंचीनुसार हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. ब्रम्हगिरीच्या दक्षिणेला कळसूबाई, अलंग, कुलंग, मदन ही सह्याद्रीतली काही शिखरे आहेत. त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून १८ किलोमीटर, मुंबईपासून १६५ किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला दर १२ वर्षांनी त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्र्यंबकेश्वरच्या (Jyotirlinga) आसपास तुम्हाला पंचवटी, मांगीतुंगी मंदिर, पांडवलेणी, काळाराम मंदिर, धम्मलेणी अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहावयास मिळतील.
३. परळी वैजनाथ
देवगिरीच्या यादवांच्या काळात प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री यांनी बांधलेले परळीच्या वैजनाथ मंदिराचा समावेश १२ ज्योतिर्लिंगामध्ये होतो. हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या परिसरात लांबलचक पायर्या आणि भव्य प्रवेशद्वार आहेत. तीन मोठी कुंडे पाहायला मिळतील. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येते. परळी वैजनाथ अंबेजोगाईपासून २५ किलोमीटर, परभणीपासून ६० किलोमीटर आहे. परळी वैद्यनाथ मंदिर बांधण्यासाठी १८ वर्षे लागल्याचे म्हंटले जाते.
घृष्णेश्वर मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आहे. वेरूळ लेण्यांजवळील येलगंगा नदीजवळ ते आहे. याचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले. हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे. बांधकाम ४४,४०० चौरस फूट क्षेत्रावर आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले हाेते.
१८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार इंदोरच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. हेमाडपंथी शैलीचे बांधकाम असलेल्या या मंदिरावरील नक्षीकाम अत्यंत सुबक आहे.
५. औंढा नागनाथ
महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे वैशिष्ट्य असलेले हेमाडपंती शैलीचे हे औंढा नागनाथ मंदिर पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने स्थापना केल्याचे मानले जाते. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट तर उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या परिसरात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे, १०८ महादेवाची मंदिरे आणि ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. आवारात एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. औंढा नागनाथ महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.
र (तामिळनाडु – रामेश्वर)
नागेश्वर (महाराष्ट्र – औंढा नागनाथ)
विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
त्र्यंबकेश्वर (मराष्ट्र – त्र्यंबकेश्वर)
केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ)
घृष्णेश्वर (महाराष्ट्र –
सोमनाथ (गुजरात – वेरावळ)
मल्आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
महांका