

सेालापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 77 जागा आणि पंचायत समितीच्या जवळपास 154 जागांसाठीचे आरक्षण सोडत 29 जुलै रोजी काढण्यात आली होती. ज्या लोकांना यावर हरकती अथवा सूचना होत्या, त्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी 19 तर पंचायत समितीसाठी 10 अशा एकूण29 हरकती दाखल झाल्या. त्यावर अभिप्राय देवून 5 ऑगस्टला अंतिम प्रसिद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसुल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या सर्व हरकतीवर अभिप्राय देवून येत्या 5 ऑगस्टरोजी अंतिम प्रसिध्दी देण्यात येणार आहे.
तालुकानिहाय हरकतींची संख्या