अक्‍कलकोट तालुक्यास भूकंपाचा सौम्य धक्‍का | पुढारी

अक्‍कलकोट तालुक्यास भूकंपाचा सौम्य धक्‍का

हंजगी : पुढारी वृत्तसेवा :  अक्‍कलकोट तालुक्यात शनिवारी सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचा हलका धक्का जाणवला. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाची तीव्रता फारशी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.
सकाळी अचानक जमिनीला कंप जाणवल्याने बचावात्मक उपाय म्हणून नागरिक घरातून बाहेर आले. मात्र भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. मात्र यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. भूगर्भातील अंतर्गत हलचालींमुळेच हा सौम्य धक्का बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, खानापूर, शेगाव, मुंडेवाडी, गुड्डेवाडी, आळगी, सुलेरजवळगे, कल्लकर्जाळ, अंकलगे आदी भागांत भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

आज सकाळी तडवळ भागात भूकंपाचा सौम्य धक्‍का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू विजापूर येथे असल्याचे कळले आहे. भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणतीही हानी झाली नाही. नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही.
– बाळासाहेब सिरसट
तहसीलदार, अक्‍कलकोट

Back to top button