सोलापूर : वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलबाबत नियोजन | पुढारी

सोलापूर : वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलबाबत नियोजन

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  सोलापुरात सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. यासाठी संवादाची भूमिका आणि कायद्याच्या चौकटीचे पालन करावे, याबाबत सूचना राहतील. सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांच्या कामांना प्राधान्य राहील. यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल सुरू ठेवण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे नूतन पोलिस आयुक्‍त राजेंद्र माने यांनी सांगितले.

महापालिका, स्मार्ट सिटी, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 143 सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 50 हून अधिक कॅमेरे लाऊन नियम मोडणार्‍या वाहनचालकांना दंडाचे ई-चलन पाठवले जाईल. यासाठी नियंत्रण कक्षात त्याची एक लिंक राहील. विपरीत घटना घडल्यास तत्काळ सतर्कता व गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष राहील. तडीपार, एमपीडीए कारवाया सुरूच राहतील, असे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी सांगितले.

गुन्हेगारी कमी करणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सातही पोलिस ठाण्यांच्या स्तरावर नागरिकांशी संवाद साधत आहोत. शांतता कमिटी सदस्यांसोबत संवाद आहे, असेही पोलिस आयुक्त माने यांनी सांगितले.

 

बंद चौक्या सुरू करण्याचा विचार
पोलिस चौक्या सध्या बंद आहेत. त्या सुरू करण्याचा विचार आहे. त्यात थोडासा बदल करण्याचा आमचा विचार आहे. हद्दीत घडलेली प्रत्येक घटना संबंधित अधिकार्‍यांच्या नजरेखालून गेली पाहिजे. त्यासाठी पोलिस ठाण्यातच तक्रार घेतली जाईल. यावर लवकरच काम सुरू होईल, असे पोलिस आयुक्त माने यांनी सांगितले.

Back to top button