नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस शनिवारी, चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विज्ञान भवनात राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री शेखावत, केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू केंद्रीय सचिव पंकज कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. (Maharashtra National Water Awards)