

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या तीन राज्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांना मदत केली आहे. त्यांनी शेतक-यांसाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकारची आजून चर्चाच सुरु असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, नाफेड कांदा खरेदीच करत नाही असे लोकांकडून मी ऐकतोय. कांद्याला निदान 1200 रुपये भाव मिळायला हवा, तशी मागणीच काही शेतक-यांनी माझ्याकडे केली आहे. शेतक-यांचे आज आतोनात नुकसान होत आहे. बागायती शेतकरी आणि जिरायती शेतकरी यात जमीन आस्मानाचा फरक आहे. जिरायत शेतक-याला अधिक मदत करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने कांदा हे अधिक महत्वाचे पीक असल्याचे पवार म्हणाले.
शेतक-यांना अनुदान द्या किंवा कांदा खरेदी करा कोणत्याही मार्गाने का होईना पण शेतक-यांची मदत करणे सध्य स्थितीला महत्वाचे आहे. अवकाळी पाऊस सध्या सुरु आहे. राज्यातील द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात माहिती गोळा करुन राज्य सरकारशी बोलणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
नागालॅंड मद्ये भाजपला पाठिंबा नाही
नागालॅंड मद्ये भाजपला पाठिंबा दिला नाही. नागालॅंडमध्ये कुठलाच पक्ष सत्ते बाहेर नाही. तर नागालॅंडमध्ये कोणत्याही शक्तींचे विभाजन होऊ नये, गटागटात भांडणे होऊ नये , समाजात दुफळी निर्माण होऊ नये या मुख्यमंत्र्यांच्या मताला आपण पाठिंबा दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.