CSK vs LSG : ऋतुराजपेक्षा भारी स्टोईनिसचे शतक; लखनौचा चेन्नईवर सुपर विजय

CSK vs LSG : ऋतुराजपेक्षा भारी स्टोईनिसचे शतक; लखनौचा चेन्नईवर  सुपर विजय
Published on
Updated on

चेन्नई; वृत्तसंस्था : ऋतुराज गायकवाडच्या शतकाला लखनौ सुपर जायंटस्च्या मार्कस स्टोईनिसने शतकानेच उत्तर दिले. चेन्नई सुपर किंग्जच्या 210 धावांचा पाठलाग करताना लखनौची आघाडीची फळी अपयशी ठरली; पण स्टोईनिसने देवदत्त पडिक्कल व निकोलस पूरन यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करून लखनौच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. त्याने 'आयपीएल'मधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर लखनौने रोमहर्षक विजयाची नोंद केली आणि 6 विकेटस्ने मॅच जिंकून 10 गुणांसह गुण तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.

चेन्नईच्या होमग्राऊंडवर त्यांच्या दोनशेपार धावांचा पाठलाग करताना दीपक चहरच्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक (0) त्रिफळाचीत झाला; पण कर्णधार के. एल. राहुल व मार्कस स्टोईनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण मुस्तफिजूर रहमानने पाचव्या षटकात के. एल. राहुलला (16) माघारी पाठवून मोठा धक्का दिला. स्टोईनिसने 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला 10 षटकांत 2 बाद 83 धावांपर्यंत पोहोचवले. 11 व्या षटकात ऋतुराजने मथिशा पथिराणाला गोलंदाजीला आणले आणि त्याने शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलचा (13) 151 कि.मी. वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळा उडवला.

लखनौने 12.2 षटकांत फलकावर 100 धावा उभ्या केल्या. स्टोईनिस 'सीएसके'ची डोकेदुखी वाढवत होता. त्याला निकोलस पूरनची चांगली साथ मिळताना दिसली. लखनौला 36 चेंडूंत 87 धावा करायच्या होत्या. स्टोईनिस व पूरन यांनी 26 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि 'सीएसके'चे टेन्शन वाढवले. शार्दूलने टाकलेल्या 16 व्या षटकात पूरनने 6,4,6,2,1 अशा 19 धावा कुटल्या. 24 चेंडूंत 54 धावा असा सामना लखनौच्या बाजूने झुकताना दिसला. स्टोईनिस व पूरन यांची 34 चेंडूंतील 70 धावांची भागीदारी पथिराणाने तोडली. पूरन 15 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 34 धावांवर शार्दूलच्या हाती झेल देऊन परतला; पण स्टोईनिस अनस्टॉपेबल होता. त्याने 56 चेंडूंत 9 चौकार व 5 षटकारांसह शतक पूर्ण केले आणि 12 चेंडूंत 32 धावा असा सामना अधिक चुरशीचा झाला. पथिराणाच्या षटकात 4,1,4,4,0,2 अशा 13 धावा लखनौच्या फलंदाजांनी चोपल्या. शेवटच्या 6 चेंडूंत 17 धावा असा सामना लखनौच्या पारड्यातच होता. स्टोईनिसने पहिल्या दोन चेंडूंवर 10 धावा कुटल्या. त्यात तिसरा चेंडू नो बॉल राहिला आणि स्टोईनिसने त्यावरही चौकार खेचला. फ्रीहिटवर चौकार खेचून स्टोईनिसने सामना संपवला. लखनौने 19.3 षटकांत 4 बाद 213 धावा करून सामना जिंकला. स्टोईनिस 63 चेंडूंत 13 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 124 धावा केल्या.

  • ऋतुराज गायकवाड याने चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले.
  • 'सीएसके'साठी सलामीवीर म्हणून 2,000 हून अधिक धावा करणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला.
  • ऋतुराजने फाफ ड्युप्लेसिस (1,960), मुरली विजय (1,663) व मिचेल हसी (1,563) यांना मागे टाकले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news