

पुढारी ऑनलाईन डेस्क : Met Gala 2021 : मेट गाला सहभागी होणं हे सेलिब्रेटींसाठी प्रतिष्ठेचे मानले जाते. सर्वजण आपापल्या अंदाजामध्ये फॅशन ट्रेंड सादर करत असतातच, पण त्याचबरोबर ते तो ट्रेंड ते सेटही करून जातात. अर्थातच ही परंपरा चालू वर्षातही खंडित झालेली नाही.
Met Gala 2021 मध्ये 'America: A Lexicon of Fashion' ही यावेळची थीम होती. चालू मेट गालामध्ये मॅडोनाच्या लेकीने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. तिने घेतलेल्या भूमिकेने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. २४ वर्षीय लॉर्देस लिऑनने आपले ॲब्ससोबत अंडर आर्म केसेस दाखवून दिले.
लॉर्देस लिऑनचा मेट गालामधील हा पहिलाच रेड कार्पेट इव्हेंट होता. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसने चांगलीच चर्चा रंगली. तिने रेड कार्पेटवर दिमाखात चाल करताना काखेतील केस दाखवत फोटोसेशनसाठी पोझिशन्स दिल्या.
मेट गालामध्ये ती झळकण्यापूर्वी ती व्होग मासिकाच्या फिचर स्टोरीमध्येही झळकली होती.
तिने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मी सर्व काही झोकून देऊन काम करण्यास तयार असताना लोकांना वाटते की मी श्रीमंताची मुलगी गुणवत्ता नसलेली मुलगी आहे, पण मी तशी नाही. तिने कॉलेजची फी स्वत:हून दिली होती.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="38048"]