London Sari Walkathon : नाकात नथनी, भरजरी नऊवारी; लंडनच्या रस्त्यांवर अवतरली महाराष्ट्रीयन नारी!

London Sari Walkathon
London Sari Walkathon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : London Sari Walkathon : भारताचा राष्ट्रीय हातमाग दिवस नुकताच 6 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस फक्त भारतातच नाही, तर लंडनमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी आयोजित साडी वॉकथॉन कार्यक्रमात महिलांनी लंडनचे रस्ते रंगीबेरंगी करून टाकले. भारतातील साडी विणणाऱ्या कारागिरांची कलाकारी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या कामाच्या जनजागृतीसाठी आयोजकांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतातील विविध प्रांतातील महिलांनी पारंपारिक पद्धतीने साडी नेसून सहभाग घेतला. महाराष्ट्रातील महिलांनी नाकात नथ, केसात गजरा अन् अंगावर नऊवारी नेसून या वॉकथॉनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

London Sari Walkathon : लंडनचे रस्ते रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या भारतीय महिलांनी दणाणले

या साडी वॉकथॉनमध्ये भारतातील 600 महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 50 महाराष्ट्रीयन महिला होत्या. लंडनच्या Trafalgar Square येथे जमून नंतर 10 डाउनिंग स्ट्रीटवरून लंडनच्या संसदेच्या बाहेर महात्मा गांधींचा पुतळ्यापर्यंत हा साडी वॉकथॉन आयोजित करण्यात आला होता. रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या हिंदी गाण्यांवर महिलांची पावले नृत्यावर थिरकली. यावेळी महिलांचा उत्साह प्रचंड दांडगा होता.

पर्यटकांचे लक्ष वेधले

वेगवेगळ्या प्रकारे साड्या नेसलेल्या या महिलांनी लंडनमधील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. ते त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढत होते. तर काहींना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. लंडनचे रस्ते रंगीबेरंगी साड्यांमुळे लंडनच्या रस्ते खऱ्या अर्थाने मल्टीकलर-मल्टीकल्चरने गजबजले होते.

London Sari Walkathon : महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत हा वॉकथॉन आयोजित करण्यात आला होता. तिथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगान म्हणून पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी वेगवेगळ्या प्रांतातील महिलांनी त्यांच्या प्रादेशिक भाषेतील गाण्यांवर नृत्य केले. नऊवारी नेसलेल्या महाराष्ट्रीयन महिलांनी गाण्यांच्या तालावर ठुमका धरत मोठी धमाल केली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news