पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी (दि.९) जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात आला असल्याचे सांगत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले.
यानुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २१, काँग्रेसला १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार आहे. सांगलीची जागा अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. यामुळे सांगलीची जागा काॅंग्रेस लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Elections 2024 Maha Vikas Aghadi seat sharing) उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.
गुढीपाडव्या मुहूर्तावर आज झालेल्या इंडिया आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रपरिषदेवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. शेकाप तसेच आम आदमी पक्षाचे नेतेही यावेळी होते.
सर्वांच्या मनातील शंकांना आता उत्तर मिळाले आहे. आता कुणाच्याही मनात प्रश्न राहिलेले नाहीत. शिवसेना २१ जागा लढणार असून आम्ही सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन दिवसांत त्यांचे उमेदवार जाहीर करतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजप हा खंडणीखोर पक्ष असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
– काॅंग्रेस -१७
-राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी (शरद पवार) -१०
-शिवसेना (ठाकरे गट) -२१
नंदुरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा- गोंदिया
गडचिरोली- चिमूर
चंद्रपूर
नांदेड
जालना
मुंबई उत्तर मध्य
पुणे
लातूर
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
मुंबई उत्तर
बारामती
शिरूर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
अहमदनगर दक्षिण
बीड
जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशिव
रत्नागिरी
बुलढाणा
हातकणंगले
संभाजी नगर
शिर्डी
सांगली
हिंगोली
यवतमाळ
वाशीम
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई उत्तर पछिम
मुंबई दक्षिण
मुंबई ईशान्य
हे ही वाचा :