नऊ मतदारांचे पुलोपॅटिया; समुद्रातून २४ तासांचा थरारक प्रवास करून पोहोचतात निवडणूक कर्मचारी | पुढारी

नऊ मतदारांचे पुलोपॅटिया; समुद्रातून २४ तासांचा थरारक प्रवास करून पोहोचतात निवडणूक कर्मचारी

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात प्रत्येक मताला महत्त्व आहे. केवळ नऊ मतदारांसाठी जहाजातून त्यानंतर स्पीड बोट, होडी आणि बोटीतून 24 तासांचा थरारक प्रवास करून निवडणूक आयोगाचे कर्मचारी अंदमान निकोबार बेटावर असणार्‍या पुलोपॅटिया या छोट्याशा पोहोचतात. यानंतर पुलोपॅटिया येथे मतदान केंद्र उभरण्यात येते आणि मतदान प्रक्रिया पार पडते.

असा सुरू होतो निवडणूक कर्मचार्‍यांचा प्रवास

पोर्ट ब्लेअर येथून जहाजाने प्रवास सुरू होतो. त्यानंतर स्पीड बोट पकडावी लागते. स्पीड बोटमधून थोडे अंतर कापल्यानंतर छोट्या होडीमधून प्रवास सुरू होतो. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात पारंपरिक छोट्या बोटीमधून पुलोपॅटिया येथे कर्मचारी पोहोचतात.

मगरींनी भरलेल्या मॅनग्रूव्हच्या जंगलातून शेवटचा टप्पा

पुलोपॅटिया येथे पोहोचण्यासाठी समुद्रातून थरारक असा प्रवास निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांना करावा लागतो. मगरींनी भरलेल्या मॅनग्रूव्हच्या जंगलातून या प्रवासाचा शेवटचा टप्पा संपतो. येथे जाताना ईव्हीएम मशिन्स वॉटरप्रूफ बॉक्समध्ये सील करून नेली जातात.

Back to top button