Lok Sabha Election Flash Back : नेहरू सरकारविरुद्ध फिरोज गांधी! | पुढारी

Lok Sabha Election Flash Back : नेहरू सरकारविरुद्ध फिरोज गांधी!

सचिन बनछोडे

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जावई आणि कालांतराने देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी यांचे ली त्यांनी लोकसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात विमा कंपन्या आणि उद्योगपती यांच्यामधील संबंधांवर घणाघाती हल्ला चढवला होता. (Lok Sabha Election Flash Back) या भाषणाची दखल त्यांचे श्वशूर व पंतप्रधान नेहरू यांना घ्यावी लागली आणि संबंधित उद्योगपतीस अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. फिरोज गांधी यांनी आपल्याच सरकारविरुद्ध जणू काही विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. विशेषतः पंतप्रधानांच्या निकटच्या वर्तुळातील नेत्यांवर त्यांचे लक्ष होते. टी. टी. कृष्णम्माचारी हे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री होते. फिरोज गांधी यांनी आकडेवारी आणि ठोस पुरावे गोळा करून मुंदडा प्रकरण उघडकीस आणले. त्यामुळे कृष्णम्माचारी व काही वरिष्ठ अधिकार्‍यांना राजीनामा द्यावा लागला! (Lok Sabha Election Flash Back )

तीन तासांत 24 प्रचारसभा!

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा कामाचा उरक दांडगा होता. उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीत तर त्यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला. ऐन उन्हाळ्यात त्या दिवसभरात अनेक प्रचारसभा घेत. त्यांनी मोहसिना किडवाई यांना उमेदवार बनवले होते. एकदा त्यांच्यासाठी चौदा प्रचारसभा ठरल्या होत्या. मात्र, इंदिरा गांधी यांनी अवघ्या तीन तासांत 24 सभा घेतल्या! रोज दहा ते बारा तास त्या वेगाने प्रवास करीत. आपल्या सहकार्‍यांसमवेत मोजकेच जेवण घेत. कधी कधी एका सफरचंदावरच दिवसभर राहत असत.

कॅश फॉर क्युरी!

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाले. 2005 मध्ये असेच एक प्रकरण घडले होते. त्यावेळीही लोकसभेतील दहा आणि राज्यसभेतील एका सदस्याची सदस्यता रद्द झाली होती. त्यावेळी एका वेब पोर्टलने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए-1’ चे सरकार होते. 12 डिसेंबर 2005 रोजी हे स्टिंग ऑपरेशन समोर आले होते. त्यामध्ये संसदेत प्रश्न विचारण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे अकरा खासदार पैसे स्वीकारत असल्याचे दाखवले होते. 24 डिसेंबर 2005 मध्ये संसदेत मतदानाच्या माध्यमातून या सर्व अकरा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

 

Back to top button