Lok Sabha Election 2024 | ‘जय जवान, जय किसान’ ते ‘तिसरी बार मोदी सरकार’, जाणून घ्या लोकप्रिय घोषणा आणि विजयाचे काय आहे गणित? | पुढारी

Lok Sabha Election 2024 | ‘जय जवान, जय किसान’ ते ‘तिसरी बार मोदी सरकार’, जाणून घ्या लोकप्रिय घोषणा आणि विजयाचे काय आहे गणित?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक पक्षांनी त्यांच्या कल्पक घोषणांच्या यशावर स्वार होऊन निवडणुका जिंकल्या आहेत, तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जेव्हा त्यांच्या घोषणा मतदारांना प्रभावित करू शकल्या नाहीत. निवडणुकीदरम्यानच्या घोषणा अनेकदा राजकारण्यांना त्यांच्या कल्पना मतदारांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. “Yes We Can” ही बराक ओबामा यांची २००८ च्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील घोषणा लोक आजही विसरलेले नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रचारमोहीम प्रभावी ठरली होती. ही घोषणा पक्षाच्या समर्थकांसह विरोधकांमध्येही चांगलीच गाजली होती. (Lok Sabha Election 2024)

आता २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपची ‘मोदी का परिवार’, ‘तीसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार’ अशा घोषणा चर्चेत आहेत. भाजपने २०१९ मधील निवडणुकीदरम्यान ‘चौकीदार’ अशी मोहीम राबवली होती.

कोणत्याही निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधून घेणारी घोषणा अथवा संदेश हा उत्साहपूर्ण, आकर्षक आणि संस्मरणीय ठरले असेच हवेत. याचा प्रत्यय २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार मोहीम त्यावेळी प्रभावी ठरली होती. भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेचे सत्ताधारी सरकार कसे अपयशी ठरले होते? हाच प्रचाराचा मुद्दा बनवला होता. सत्ताधारी सरकारचे अपयश सांगत ‘आम्ही तयार आहोत’ असे सांगत त्यांनी महत्त्वाचे १०-१५ मुद्दे त्यांनी मतदारांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे भाजपला परिवर्तन आणण्यात यश आले.

‘अब की बार मोदी सरकार’

बहुंताश लोकांना परस्परविरोधी मते वाचण्यासाठी वेळ नसतो. ते लोकप्रिय नेतृत्त्वाने केलेल्या वक्तव्याच्या आधारे एकाची निवड करतात. जी घोषणा सातत्याने त्यांच्या कानावर पडते. यामुळे पक्षांसाठी हे आवश्यक होऊन जाते की ते मतदारांना प्रभावित करणारे आकर्षित संदेश, घोषणा तयार करणे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रचारमोहीम प्रभावी ठरली होती. आता २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली आहे.

जय जवान, जय किसान

आकर्षक घोषणा मतदारांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या निवडणूक प्रचारादरम्यान ‘गरिबी हटाओ, देश बचाओ’ असा नारा दिला होता. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत होती आणि या संदेशामुळे गरीबांना आशा निर्माण झाली. त्याआधीची ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरली गेली. या घोषणा पहिल्यांदा भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी १९६५ मध्ये दिली होती. ही घोषणा पाकिस्तान हल्ल्याच्या विरोधात देशवासीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि देशातील अन्नटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी होती. यामुळे काँग्रेसला निवडणुकीत यश मिळण्यास मदत झाली होती.

काही विचित्र घोषणा

फरक एवढाच होती की त्यावेळी माध्यमे कमी होती. आता प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जातो. आधीच्या काळी सभांमधून आणि रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत आश्वासने, घोषणा पोहोचवल्या जायच्या. ‘अच्छ दिन आने वाले है’, ही घोषणा सर्वाधिक प्रभावी म्हणावी लागेल. पण गेल्या काही वर्षात विचित्र घोषणाही पहायला मिळाल्या. ज्याचा मतदारांवर कसलाही प्रभाव पडला नाही. २०१७ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्रित प्रचार मोहीम राबवली होती. त्यावेळी त्यांनी ‘यूपी को ये साथ पसंद है’ अशी घोषणा दिली होती. ही घोषणा अखिलेश यादव आणि राहुल गांधी एकत्र आल्याचे दर्शवणारा होती. पण या घोषणेने स्पष्टपणे फारसे काही साध्य झाले नाही. यातून चांगल्या भविष्याची कोणतीही आशा दिली गेली नव्हती आणि मतदारांना कृती करण्याचे आवाहनदेखील त्यात नव्हते. त्यामुळे ती मतदारांना आकर्षित करु शकली नाही. (Lok Sabha Election 2024)

मणिपूरमध्ये शेवटच्या क्षणी काय घडले?

मणिपूरमध्ये भाजपने प्रभावी अशी प्रचार मोहीम राबवली होती. ‘भाजप येणार, परिवर्तन घडवणार’, असा त्यांचा नारा होता. प्रसारमाध्यमांतून व्यावसायिक स्वरुपात ही प्रचार राबविण्यात आली. या जाहिरातबाजीने शेवटच्या क्षणी चित्र बदलले. भाजपच्या अनेक उमेदवारांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. यामुळे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा मिळण्यापासून रोखले गेले.

या लेखात शिवम शंकर सिंह यांच्या ‘How to Win an Indian Election : What Political Parties Don’t Want You to Know’ या पुस्तकातील संदर्भ वापरण्यात आला आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button