Bodybuilder Heart Attack : बॉडीबिल्डर्सना Heart Attack का येतो; काय आहेत त्याची शास्त्रीय कारणं?

नुकतेच विरेंद्र घुमान या बॉडी बिल्डरचं ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं.
Bodybuilder Heart Attack
Bodybuilder Heart Attackpudhari photo
Published on
Updated on

Bodybuilder Heart Attack :

बॉडीबिल्डर्सना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदवस वाढत आहे. नुकतेच विरेंद्र घुमान या बॉडी बिल्डरचं ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. तो अवघ्या ५३ वर्षााच होता. विशेष म्हणजे तो शुद्ध शाकाहारी होता. व्यायाम करणारा अन् चरबीचं प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या बॉडी बिल्डर्समध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असण्याची कारणं काय? त्याला काही शास्त्रीय आधार आहे का याबाबत जाणून घेणार आहोत.

Bodybuilder Heart Attack
bodybuilder varinder singh ghuman: जगातील पहिला शाकाहारी बॉडीबिल्डर आणि सलमानचा सह-कलाकार वरिंदर सिंग घुमन यांचं निधन; जाणून घ्या त्यांचं प्रेरणादायी आयुष्य!

बॉडीबिल्डर्समध्ये हृदयविकाराचा धोका वाढवणारी मुख्य कारणे :

ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स आणि इतर उत्तेजक पदार्थांचा वापर (Anabolic Steroids and Other Stimulants)

ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सचा (Anabolic steroids) गैरवापर रक्तदाब वाढवतो, कोलेस्टेरॉलच्या पातळीत बदल करतो. चांगले कोलेस्टेरॉल कमी आणि वाईट कोलेस्टेरॉल वाढवते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढवतो. यामुळे हृदयाची संरचना आणि कार्य बिघडून ते मोठे होऊ शकते (cardiomegaly or ventricular hypertrophy).

बॉडीबिल्डर वापरत असलेले इतर कार्यक्षमता वाढवणारे (Performance-enhancing) पदार्थ देखील हृदय गती आणि रक्तदाब वाढवून हृदयावर ताण आणू शकतात.

अति-तीव्र आणि अति-प्रमाणात व्यायाम

अत्यंत जड वजन उचलणे आणि उच्च तीव्रतेचा व्यायाम करणे यांमुळे हृदयावर खूप जास्त ताण येतो. शरीरात स्नायूंचे प्रमाण खूप जास्त झाल्यास, हृदयाला शरीराच्या या मोठ्या भागाला रक्त पुरवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते, ज्यामुळे कालांतराने हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त आणि सातत्याने कडक व्यायाम केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

Bodybuilder Heart Attack
Silent Heart Attack Cause | तुम्ही ज्याला 'ऍसिडिटी' समजता, तो 'सायलेंट हार्ट अटॅक' असू शकतो! लगेच व्हा अलर्ट; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

आहार आणि डीहायड्रेशन (Diet and Dehydration)

स्पर्धेच्या तयारीदरम्यान, बॉडीबिल्डर्स 'श्रेड' (defined look) दिसण्यासाठी मुद्दाम शरीरातील पाणी कमी करतात. तसेच लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे (diuretics) घेतात. यामुळे रक्त घट्ट होते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा आणि हृदयाच्या लय बिघडण्याचा (cardiac arrhythmia) धोका वाढतो.

डीहायड्रेशनसोबत पोटॅशियम आणि सोडियमसारख्या आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते, जे हृदयाच्या कार्यासाठी महत्त्वाचे असतात.

त्वरित वजन कमी करण्याच्या पद्धती

स्पर्धेत भाग घेण्यासाठी कमी वेळात अचानक आणि कठोर आहार नियंत्रण (severe calorie restriction) करणे, यामुळे शरीरात आणि हृदयाच्या कार्यामध्ये मोठे असंतुलन निर्माण होऊ शकते.

आरोग्याकडं दुर्लक्ष

काही बॉडीबिल्डर्सना आधीपासून हृदयविकार (उदा. कोरोनरी आर्टरी डिसीज) किंवा उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes) अशा समस्या असू शकतात, ज्या तीव्र व्यायामामुळे अचानक बळावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news