Jaya Kishori| जया किशोरी बनल्या 'स्टाईल आयकॉन'; जाणून घ्या, साधेपणातही कसे दिसावे खास

Jaya Kishori | प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि सुप्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांना आज कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही.
Jaya Kishori
Jaya Kishori
Published on
Updated on

Jaya Kishori Case

प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि सुप्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांना आज कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. आपल्या प्रभावी वाणीसोबतच त्या त्यांच्या साध्या आणि आकर्षक स्टाइलसाठी ओळखल्या जातात. त्या कुठेही गेल्या तरी त्यांचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

असाच एक प्रसंग त्यांच्या 5 वीच्या मैत्रिणीच्या लग्नात घडला, जिथे त्यांनी परिधान केलेला सफेद सूट वधू आणि इतर सजून आलेल्या पाहुण्यांवरही भारी पडला. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात, ज्यात त्या आपल्या भक्तिगीते आणि विचारांनी लोकांच्या मनाला स्पर्श करतात. या सगळ्याव्यतिरिक्त, त्यांचा साधा आणि मिनिमलिस्ट फॅशन सेन्स लोकांना खूप आवडतो.

Jaya Kishori
Horoscope 21 October 2025: धनप्राप्तीचा योग! लक्ष्मीपूजन आणि ग्रहस्थिती 'या' राशींसाठी आहे सर्वात खास!

पांढऱ्या सूटमधील साधेपणा ठरला खास

जया किशोरी नुकत्याच त्यांच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या लग्नात सहभागी झाल्या होत्या. या लग्नात इतर सर्व पाहुणे फुल मेकअप आणि हेवी डिझायनर कपड्यांमध्ये आले होते. पण जया किशोरी मात्र एकदम साध्या सफेद सूटमध्ये हजर झाल्या. त्यांनी कोणताही जास्त मेकअप किंवा भारी ज्वेलरी परिधान केली नव्हती. तरीही, त्यांच्या साधेपणामुळे त्या गर्दीत सर्वात वेगळ्या आणि सुंदर दिसत होत्या. इतकंच नाही, तर अनेकांनी त्यांच्या लूकची तुलना चक्क वधु मैत्रिणीच्या लूकसोबत केली.

जया किशोरी यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लाल लेहेंग्यात वधु दिसत आहे आणि तिच्यासोबत असलेल्या 'ब्राइड्समेड'नी देखील स्टायलिश लेहेंगा घातला आहे. पण या सगळ्यांमध्ये जया किशोरी यांचा पांढऱ्या सूटमधील साधेपणा आणि सौंदर्यच उठून दिसत आहे.

Jaya Kishori
Multi Cap Fund |बरोडा बीएनपी परिबास मल्टिकॅप फंड

जया किशोरींचा खास फुल स्लीव्ह कुर्ता लूक

जया किशोरी नेहमीच लॉन्ग लेंथ फुल स्लीव्हज कुर्ता पसंत करतात. लग्नासाठी त्यांनी सफेद रंगाचा हाच पॅटर्न निवडला. त्यांच्या कुर्त्यावर फुलांच्या डिझाईनची नाजूक सफेद आणि सिल्वर धाग्यांची भरतकाम केलेले आहे, ज्यामुळे तो सूट साधा असूनही क्लासी आणि सुंदर दिसत होता. यासोबत त्यांनी प्लेन पांढरा दुपट्टा साध्या पद्धतीने खांद्यावर पिनअप केला होता. ज्वेलरीमध्ये त्यांनी केवळ सिल्वर झुमके घातले होते. याशिवाय, हातात अंगठी आणि स्टाईलसाठी काळा चष्मा वापरून त्यांनी आपला देसी लूक पूर्ण केला.

गुलाबी सूटमधील सौंदर्य

लग्नाच्या मुख्य समारंभाव्यतिरिक्त इतर फंक्शनसाठी जया किशोरी गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसल्या. या सूटची व्ही-नेकलाइन लेस आणि सिल्वर वर्कने हायलाइट केली होती. यावर बूट्यांचे डिझाइन होते, तर दुपट्टा थोडा हेवी ठेवण्यात आला होता, ज्याच्या बॉर्डरवर कुर्त्यापेक्षा जास्त काम होते. या लूकला कॉम्प्लिमेंट करणारे पिंक स्टोनचे ड्रॉप इअरिंग्ज त्यांनी परिधान केले होते.

जया किशोरी यांनी आपल्या दोन्ही लूकला कपाळावर छोटी टिकली लावून पूर्ण केले. केसांचा मध्यभागी भांग पाडून त्यांनी केस मोकळे सोडले होते. सटल आणि नॅचरल मेकअप आणि पिंक लिप्समुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news