Diet Tips | ब्यूटी क्रीमपेक्षा असरदार ही 8 फळं; त्वचेला हवीये नैसर्गिक चमक? मग डाएटमध्ये ही फळं खा!

Diet Tips | आपण सगळेच तरुण आणि तजेलदार दिसावं अशी इच्छा बाळगतो. पण वय जसजसं वाढतं, तसतसे चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, सैल त्वचा दिसायला लागते.
Nutrition Tips
Nutrition TipsCanva
Published on
Updated on

Diet Tips | आपण सगळेच तरुण आणि तजेलदार दिसावं अशी इच्छा बाळगतो. पण वय जसजसं वाढतं, तसतसे चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, सैल त्वचा दिसायला लागते. काही जण महागडे क्रीम्स, पार्लर ट्रीटमेंट्स करतात. पण खरी गोष्ट काय माहितेय? तर त्वचेचा उजाळा आणि तरुणपणा टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपला आहार.

जर डाएटमध्ये योग्य फळं खाल्ली, तर त्वचेला आतून पोषण मिळतं आणि बऱ्याच काळापर्यंत त्वचेवर वयाचं परिणाम दिसत नाही. चला तर बघूया अशी कोणती फळं आहेत जी त्वचेला तरुण, तजेलदार आणि ग्लोइंग ठेवतात.

Nutrition Tips
Brain Eating Amoeba | मेंदू खाणारा अमिबा

1. पपई – नैसर्गिक स्किन टॉनिक

पपईत पपेन नावाचं एन्झाईम असतं, जे त्वचेतील म dead cells काढून टाकतं. यामुळे त्वचा ताजी आणि मुलायम दिसते. रोज थोडी पपई खाल्ली, तर सुरकुत्या कमी होतात आणि डाग-डखलेही हळूहळू नाहीसे होतात.

2. संत्री – व्हिटॅमिन C चा खजिना

संत्र्यात भरपूर व्हिटॅमिन C असतं. हे व्हिटॅमिन कोलॅजन तयार करतं, जे त्वचेची टवटवी टिकवून ठेवतं. संत्रं खाल्ल्याने किंवा संत्र्याचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरचा निस्तेजपणा जातो आणि चेहरा उजळून दिसतो.

3. सफरचंद – रोज एक, डॉक्टर दूर ठेव

सफरचंदात antioxidants मुबलक प्रमाणात असतात. हे त्वचेचं वृद्धत्व कमी करतं. रोज एक सफरचंद खाल्लं तर त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो टिकतो.

4. डाळिंब – तरुणपणाचं गुपित

डाळिंब रक्तशुद्धी करतो आणि त्वचेला आतून चमक आणतो. यात असलेले antioxidants सुरकुत्या, काळे डाग कमी करतात. डाळिंब खाल्ल्याने चेहऱ्यावरची elasticity टिकते आणि त्वचा सैल पडत नाही.

Nutrition Tips
Kidney Stone | मूत्रपिंडातील खडे आणि होणारी गुंतागुंत

5. केळी – मॉइश्चरचं पॉवरहाऊस

केळीत पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 असतं, जे त्वचेला हायड्रेट ठेवतं. कोरडी आणि राठ त्वचा असणाऱ्यांनी दररोज केळी खाल्ली तर त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.

6. द्राक्षं – नैसर्गिक अँटी-एजिंग फळ

द्राक्षं खाल्ल्याने त्वचेचं premature ageing कमी होतं. यात असलेले फ्लॅवोनॉइड्स आणि रेसव्हेराट्रोल (Resveratrol) त्वचेचं संरक्षण करतात आणि त्वचा तरुण ठेवतात.

7. स्ट्रॉबेरी – चेहऱ्याचा नैसर्गिक फेसपॅक

स्ट्रॉबेरीत असलेलं व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ करतात. रोज स्ट्रॉबेरी खाल्ल्यास त्वचेवरची जळजळ कमी होते आणि चेहरा ताजातवाना दिसतो.

8. कलिंगड – पाण्याचा नैसर्गिक स्रोत

कलिंगडात ९०% पाणी असतं. उन्हाळ्यात त्वचेचा ग्लो टिकवायचा असेल तर रोज कलिंगड खा. हे शरीर डिटॉक्स करतं आणि त्वचेवरील निस्तेजपणा दूर करतो.

महागडे फेसपॅक किंवा क्रीम्स लावण्यापेक्षा रोज आहारात योग्य फळं खाल्ली तर त्वचा नैसर्गिकरित्या तरुण आणि तजेलदार राहते. पपई, संत्री, डाळिंब, केळी, सफरचंद, द्राक्षं, स्ट्रॉबेरी आणि कलिंगड ही फळं नियमित खाल्ल्यास वृद्धत्वाची चिन्हं उशिरा दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news