Kidney Stone | मूत्रपिंडातील खडे आणि होणारी गुंतागुंत

kidney stones complications
Kidney Stone | मूत्रपिंडातील खडे आणि होणारी गुंतागुंतPudhari File Photo
Published on
Updated on

डॉ. अनिल ब्राडू

कॅल्शियम, युरिक अ‍ॅसिड आणि इतर खनिजांच्या अतिरेकामुळे मूत्रपिंडामध्ये खडे तयार होतात. हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. वेळीच उपचार न केल्यास ते गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात.

जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्झॅलेट किंवा युरिक सिडचे प्रमाण वाढते, तेव्हा ते स्फटिकयुक्त कणांच्या रूपात किडनीत जमा होतात. लहान खडे दुर्लक्षित होऊ शकतात; परंतु मोठ्या खड्यांवर वेळेवर उपचार न केल्यास वेदना आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंडातील खड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी वेळीच उपचार करणे महत्त्वाचे असते.

गुंतागुंत

मूत्रमार्गाचे संसर्ग (यूटीआय) : मूतखड्यांमुळे मूत्र प्रवाह रोखला जातो, ज्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होतो. लघवी करताना जळजळ होणे, दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी होणे, ओटीपोटात दुखणे आणि लघवीवाटे रक्त येणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

हायड्रोनेफ्रोसिस :

मूत्र विसर्जनास अडथळा आल्याने मूत्रपिंडाला सूज येते. शिवाय त्यामुळे मूत्रावाटे रक्तस्राव होणे आणि मळमळणे तसेच उलट्या देखील होतात.

दीर्घकालीन मूत्रपिंड रोग :

वारंवार खडे होणे हे कालांतराने मूत्रपिंडाच्या ऊतींना नुकसान पोहोचवू शकते आणि दीर्घकालीन मूत्रपिंड रोगाचा धोका वाढू शकतो.

रक्तस्राव आणि व्रण :

मोठे खडे बाहेर पडल्याने मूत्रमार्गाचे नुकसान होते आणि व्रण उठल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

कारणे

* निर्जलीकरण किंवा पाणी कमी पिणे.

* मीठ, साखर किंवा प्रथिनांचे अतिप्रमाणातील सेवन.

* लठ्ठपणा.

* मूत्रपिंडातील खड्यांचा कौटुंबिक इतिहास.

* मूत्रमार्गात संसर्ग किंवा सांध्यांचे विकार यासारख्या वैद्यकीय परिस्थिती मूत्रपिंडातील खड्यांची निर्मिती हे कारण ठरू शकतात.

लक्षणे कोणती?

* ओटीपोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरेत वेदना.

* लघवी करताना वेदना.

* गुलाबी, लाल किंवा फेस येणारी लघवी.

* वारंवार लघवी करण्याची इच्छा. मळमळ किंवा उलट्या.

* या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित निदान आणि व्यवस्थापनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उपचार

* लहान खडे जास्त पाणी पिऊन आणि वेदनाशामक औषधांनी नैसर्गिकरीत्या निघून जातात. मोठ्या खड्यांना शॉक वेव्ह थेरपी (लिथोट्रिप्सी), युरेटेरोस्कोपी किंवा दुर्बीण शस्त्रक्रियासारख्या प्रक्रियांची गरज भासते.

* दररोज भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा, आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे, रोजच्या आहारात लिंबू आणि संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा.

* वजन नियंत्रित राखावे आणि पूर्वी खडे झाले असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करावे. आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळीच उपचार करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news