

Adulterated Salt : अलीकडे प्रत्येक पदार्थात भेसळ आढळून येते. भेसळीविरोधात कितीही कठोर कायदे केले असले तरी त्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. स्वयंपाक घरातील अनेक पदार्थातही भेसळ आढळून येते.
त्यातही मिठासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत घटकातही आजकाल भेसळ आढळून येते. मिठाचे शरीराला असणारे अनेक उपयोग आहेत. अन्नाला चव आणण्यासाठी तसेच शरीरातील पाणी आणि मिनरल्सचे प्रमाण कायम राहते. याशिवाय ब्लडप्रेशर ही नियंत्रणात राहते. पण याच चव आणणाऱ्या मिठात भेसळ असेल तर हेच मीठ आरोग्याचा मोठा शत्रूही बनू शकतो. या भेसळयुक्त मिठात असलेल्या केमिकल आणि पांढरी भुकटी यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात.
यामुळे पचनाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. याशिवाय डायरिया, पोषक तत्वांची कमतरता, केस गळती, डोकेदुखी, पोटदुखी यासारख्या अनेक समस्या भेसळयुक्त मिठाने निर्माण होतात.
याशिवाय हे मीठ पचवण्यासाठी शरीराला तुलनेने अधिक मेहनत घ्यावी लागले. तसेच या मिठाच्या सततच्या वापराने किडनी खराब होण्याचा धोका अधिक वाढतो.
एका काचेच्या ग्लासमध्ये नितळ पाणी घ्या. त्यात मीठ घाला. हे मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळवून पाणी तसेच नितळ आणि शुद्ध राहिले तर मिठात कोणतीही भेसळ नाही हे ओळखावे. याउलट भेसळ असलेले मिठाचे पाणी थोडे अशुद्ध दिसू लागते.
अजून एक उपाय म्हणजे एका बटाट्याचे समान काप करा. त्यावर दोन्ही बाजूला मीठ लावा. थोड्या वेलाने त्यावर लिंबू पिळा. बटाट्याचा रंग निळसर झाल्यास तुमचे मीठ भेसळयुक्त असल्याचे सिद्ध होते.
त्यामुळे मीठ खरेदी करताना ते FSSAI आणि (BIS) मार्क आहेत हे पडताळूनच मीठ खरेदी करा.