

हिवाळ्यात संत्रे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. यामुळे व्हिटॅमिन C मिळतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचा उजळते. पण अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे संत्री खाण्यापेक्षा त्याची साल शरीरासाठी जास्त फायद्याची असते. संत्र्याच्या सालीत व्हिटॅमिन C चं प्रमाण फळापेक्षा अधिक असतं. त्यात फायबर, फ्लॅव्होनॉयड्स, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पेक्टिन, आणि अनेक हेल्दी प्लांट कंपाउंड्स आढळतात, जे शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
दैनंदिन जीवनात आपण साधारणपणे संत्र्याची साल फेकून देतो; परंतु आरोग्यतज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने वापरल्यास संत्र्याची साल त्वचेसाठी, पचनासाठी, दातांसाठी, हृदयासाठी आणि वजन नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
संत्र्याच्या सालीचे शरीराला होणारे प्रमुख फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
संत्र्याच्या सालीत फळापेक्षा ३-४ पट अधिक व्हिटॅमिन C असते. हे शरीरातील पेशींना मजबुती देते आणि हिवाळ्यात वारंवार होणारा सर्दी-खोकला टाळते. अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध राहते.
पचन प्रक्रिया सुधारते
सालीत असलेले फायबर आणि पेक्टिन पोटातील जडपणा, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता कमी करतात. पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि अपचनाची समस्या दूर राहते.
वजन कमी करण्यास मदत
संत्र्याच्या सालीत एक नैसर्गिक संयुग असते जे फॅट मेटाबॉलिझम वाढवते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा उकळवून केलेला चहा अत्यंत उपयोगी मानला जातो.
त्वचा उजळते आणि पिंपल्स कमी होतात
सालीचा पावडर किंवा फेसपॅक त्वचेवरील तेलकटपणा, ब्लॅकहेड्स आणि पिग्मेंटेशन कमी करतो. व्हिटॅमिन C मुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळ आणि तजेलदार बनते.
दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर
सालीत असलेले जंतूनाशक गुण दातांची पिवळसरता कमी करतात. नियमित वापराने तोंडातील दुर्गंधी कमी होते आणि हिरड्या निरोगी राहतात.
हृदय निरोगी ठेवते
फ्लॅव्होनॉयड्स हे संयुग रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते. त्यामुळे हृदयाकडे रक्तपुरवठा सुरळीत राहतो आणि हृदयरोगांचा धोका कमी होतो.
मानसिक ताण कमी करते
संत्र्याच्या सालीचा सुगंध नैसर्गिक स्ट्रेस रिलीफ म्हणून काम करतो. अरोमा थेरपीमध्ये या सालीपासून मिळणाऱ्या ऑईलचा वापर केला जातो, ज्यामुळे मन शांत राहते आणि झोप सुधारते.
सालीची पावडर बनवून फेसपॅक किंवा स्क्रबमध्ये वापरा.
सालीचा हर्बल चहा पचन सुधारण्यासाठी उपयुक्त.
घरात नैसर्गिक रूम फ्रेशener म्हणूनही वापरता येते.
नेहमी रसायनमुक्त, नीट धुतलेली साल वापरा.