Dates During Pregnancy | गरोदरपणात खजूर खाणे का आवश्यक आहे? जाणून घ्या फायदे

Dates During Pregnancy | गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि महत्वाचा टप्पा असतो.
Dates During Pregnancy
Dates During PregnancyCanva
Published on
Updated on

गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि महत्वाचा टप्पा असतो. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक जैविक आणि हार्मोनल बदल होतात, त्यामुळे शरीराला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. अशा वेळी खजूर हा एक असा अन्नघटक आहे जो नैसर्गिकरीत्या शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये देतो.

Dates During Pregnancy
Arthritis Symptoms | संधिवात म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपचारांची सविस्तर माहिती

खजूर – एक उत्तम नैसर्गिक पोषणस्रोत

खजूरमध्ये फोलेट, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि बी6 हे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः फोलेट हे बाळाच्या मज्जातंतूंच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे, त्यामुळे अनेक डॉक्टर गरोदर महिलांना फोलेट सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात. मात्र खजूरातून नैसर्गिक पद्धतीने फोलेट मिळवता येते.

थकवा दूर करणारा नैसर्गिक ऊर्जा स्रोत

खजूर हा नैसर्गिकरीत्या कार्बोहायड्रेट्सचा स्रोत असल्याने गरोदर महिलांना लगेच ऊर्जा मिळवण्यासाठी ते उपयुक्त ठरतो. यामुळे शरीर थकवा अनुभवत नाही आणि दिवसभर उत्साही राहता येते.

पचनसंस्थेचे आरोग्य राखतो

गरोदरपणात अनेक महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. खजूरमध्ये असलेला उच्च फायबर मलावष्टंभ रोखतो आणि नियमित शौचास मदत करतो. त्यामुळे पचनसंस्था संतुलित राहते.

प्रसवपूर्व कालावधीत मदत करणारा पदार्थ

काही संशोधनांनुसार, गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यांत खजूर खाल्ल्याने गर्भाशयाच्या ग्रीवेचा विस्तार वेगाने होतो आणि प्रसव अधिक सुलभ होतो.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो

खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गरोदरपणात ब्लड प्रेशरचे चढ-उतार सामान्य असतात, त्यामुळे खजूर यासाठी लाभदायक ठरतो.

Dates During Pregnancy
Breast Cancer Cause | ब्रेस्ट जाणून घ्या धोका वाढवणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

आयरनच्या कमतरतेवर उपाय

गर्भवती महिलांमध्ये आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याचा धोका असतो. खजूर आयर्नचा चांगला स्रोत आहे आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस चालना देतो.

डायबेटिक महिलांनी घ्यावी काळजी

जरी खजूर आरोग्यवर्धक असले तरी त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांना डायबेटिस आहे, त्यांनी खजूर मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा.

अँटीऑक्सिडंट्सचे नैसर्गिक स्रोत

खजूरमध्ये फ्लॅव्होनॉईड्स, फेनोलिक कंपाऊंड्स यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news