Swanandi Berde : लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे मराठी चित्रपटात!

स्वानंदी बेर्डे आणि सुमेध मुदगलकर
स्वानंदी बेर्डे आणि सुमेध मुदगलकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वानंदी बेर्डे आणि सुमेध मुदगलकर या नव्या जोडीचा प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून ढळकणार आहे. योगेश जाधव दिग्दर्शित हा चित्रपट १ मार्चला रिलीज होणार आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेचं सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर रोमँटिक एन्ट्री होत आहे.

संबंधित बातम्या –

स्वानंदी बेर्डेचं 'मन येड्यागत झालं', सुमेध मुदगलकरच्या प्रेमात

प्रेमाची परिभाषाही प्रत्येकासाठी निराळी असते. बरेचदा हे प्रेम एकतर्फी असल्याचंही पाहायला मिळालं आहे. आणि या एकतर्फी प्रेमामुळे आलेल्या अडचणी, संकट कित्येकांनी जवळूनही पाहिली आहेत. अशातच एका अनोख्या प्रेमाची आगळीवेगळी लव्हस्टोरी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

स्वानंदीच्या जोडीला या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रुप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते यांची निर्मिती आहे. कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे आहेत. लेखन विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांचे आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

निलेश पतंगे यांनी संगीत दिले आहे. गाणी सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे लिखित आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांनी त्यांचा सुमधुर व दमदार आवाज दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news